‘मेळा’ : लेखक म्हणून समकालाकडे पाहण्याची दासू वैद्य यांची एक दृष्टी आहे. या दृष्टीमुळेच या लेखनाला सकसता आणि वैविध्यता प्राप्त झाली आहे
दासू वैद्य यांच्या लेखनात लहान-मोठ्या घटना, प्रसंग आणि अनुभवाकडे पाहण्याच्या आश्वासक दृष्टीसोबतच माणसाबद्दलची विलक्षण ओढ ओतप्रोत भरून राहिली आहे. जीवनानुभव घेणारा लेखक आपल्या काळाशी एकरूप होतं, जीवनाचे, मानवी स्वभावाचे सर्व रंग प्रकट करत, भवतालाचे, आपल्या गावाचे विलक्षण आणि चित्रदर्शित्व ओघवत्या भाषेत करतो. लेखनातून पाहिलेले, टोचलेले, बोचलेले आणि अंतर्मुख करणारे अनुभव लेखक शब्दबद्ध करतो.......